राज्यपालांच्या हस्ते डिजिटल ‘राजभवन पत्रिका’ पुस्तकाचे प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२३ । मुंबई । राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या चार महिन्यांत केलेल्या कार्याचा सचित्र लेखा-जोखा असलेल्या ‘राजभवन पत्रिका’ या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले.

राज्यपाल सचिवालयाने तयार केलेल्या ‘राजभवन पत्रिका’ पुस्तकामध्ये राज्यपालांनी एप्रिल ते जुलै या कालावधीत घेतलेल्या गाठीभेटी, शिष्टमंडळासोबत झालेल्या भेटी, उच्च शिक्षण व आदिवासी विकास, इत्यादी क्षेत्रात केलेले कार्य, जिल्हा दौरे आदी कामांची सचित्र माहिती देण्यात आली आहे.

सदर डिजिटल पुस्तक राजभवनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.  पुस्तकामध्ये निवडक कार्यक्रमांच्या व्हिडिओ लिंक्सदेखील देण्यात आल्या आहेत. पुस्तक सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करुन देखील पाहता येईल.

Flip Book link :-  https://heyzine.com/flip-book/c24bb2158e.html 

PDF book link :- https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3c8758b517083196f05ac29810b924aca/uploads/2023/08/2023080194.pdf


Back to top button
Don`t copy text!