बांधकाम कामगार कल्याणकारी योजना तालुक्यात प्रभावीपणे राबवा

कामगारमंत्री ना. आकाश फुंडकर यांचे प्रतिपादन


दैनिक स्थैर्य । 22 मे 2025 । फलटण। फलटण तालुक्यातील बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनेचे लाभ देण्यात यावेत. तसेच ही योजना अधिक पारदर्शक व प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे आवाहन कामगारमंत्री ना. आकाश फुंडकर यांनी केले.
यावेळी माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली.

यावेळी कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी ही योजना फलटण तालुक्यात प्रभावीपणे राबवून योजनेतील सर्व अडचणी सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. महायुती सरकार गोरगरीबांचे काम करणारे सरकार आहे. जास्तीत जास्त लाभार्थी ना शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवा असे आवाहन केले.

यावेळी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी लवकरच बांधकाम कामगार संघटना व लाभार्थींना भांडी व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगितले.


Back to top button
Don`t copy text!