दैनिक स्थैर्य | दि. 15 ऑगस्ट 2024 | फलटण | राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचे अनुदान 3 हजार रुपये हे सर्वसामान्य माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरासह तालुक्यामधील 25 हजार फॉर्म भरण्यात आले होते. ते सर्वच्या सर्व मंजूर करण्यात आले आहेत; अशी माहिती राजे गटाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब चोरमले यांनी दिली.
याबाबत बोलताना दादासाहेब चोरमले म्हणाले की; मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य माता-भगिनींना लाडकी बहीण योजनेचे अनुदान प्राप्त झाले आहे.
फलटण शहरासह तालुक्यामधील लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 58 हजार 450 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 57 हजार 468 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. एकूण 794 प्रलंबित असून 64 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत; असेही चोरमले यांनी स्पष्ट केले.