दैनिक स्थैर्य | दि. 15 ऑगस्ट 2024 | फलटण | मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजितदादा पवार यांच्या महायुतीचे सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केल्या नंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी व राज्य शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन अर्ज भरून घेतले त्यांचा सन्मान करावा असे निर्देश भाजपा नेते जयकुमार शिंदे यांनी दिले.
आज कोळकी येथे २४०० पात्र लाभार्थी महिला पैकी १२०० महिलांनी या योजनेचे फॉर्म भरले होते. व उर्वरित फार्म भरण्याचे काम सुरू आहे. त्या आज शासनाच्या वतीने 3 हजार रुपयाचा पहिला हप्ता लाडक्या बहिणीच्या खातेवर जमा होण्यास फलटण तालुक्यात सुरुवात झाली आहे. म्हणून फलटण तालुक्यातील भाजपचे विधानसभा प्रमुख सचिन कांबळे – पाटील यांच्या हस्ते कोळकीतील सुप्रिया जाधव व घोरपडे ताई यांचा घरी जाऊन औपचारिक रित्या सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी सांगितले की विरोधी पक्ष याबाबतीमध्ये महिलांच्या मध्ये शासनाबाबत गैरसमज पसरवण्याचा काम करत होते विरोधामध्ये भूमिका घेऊन महिलांना भडकवण्याचं काम करीत आहेत परंतु आज महिला चे खात्यात पैसे जमा झाले आहेत.
भाजपचे सरकार हे महिलाचा सन्मान करणारे सरकार आहे. तरी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांमध्ये ज्या महिलांना त्याचा सन्मान करावा असे आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरून महिलांना याबाबत आत्मविश्वास वाढेल व विरोधकांच्या नेरटेवला चपराक बसेल व हे आपलेच सरकार असेल महिलांना वाटेल.
यावेळी कार्यक्रमाच्या वेळी पश्चिम मंडलचे अध्यक्ष अमोल सस्ते, रेल्वे बोर्डाचे सदस्य रियाज इनामदार युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष रणजीत जाधव उपस्थित होते.