धनुर्विद्या स्पर्धेमध्ये यथार्थ नलवडेचे यश


दैनिक स्थैर्य | दि. २१ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
मुंबई येथे राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटामध्ये श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचा विद्यार्थी यथार्थ नलवडे याने तृतीय क्रमांक मिळवला.

या यशाबद्दल यथार्थचे श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, सचिव अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले, अध्यक्ष तुषार गांधी, संचालक तेजसिंह भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, प्रशासकीय संचालिका सौ. स्वाती फुले, मुख्याध्यापक सुनील टेंबरे, प्रदीप चव्हाण, क्रीडा शिक्षक संदीप ढेंबरे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!