कंगनाच्या ट्विटवर राऊतांचे भाष्य:कंगनाने शिवसेनेचा बाबर असा उल्लेख केल्यानंतर संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले – बाबरी तोडणारे आम्हीच आहोत, ती काय आम्हाला म्हणतेय?


 

स्थैर्य, मुंबई, दि.९: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटच्या मुंबईविषयीच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आज ती मुंबईत आली दरम्यान ती येण्यापूर्वीच तिच्या कार्यालयाची बीएमसीने अनधिकृत ठरवून तोडफोड केली. यानंतर तिने शिवसेनेची तुलना बाबरसोबत केली. यावर संजय राऊतांनी तिच्यावर पटलवार केला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये राऊतांनी हे भाष्य केले आहे.

संजय राऊत बीएमसीच्या कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईविषयी म्हणाले की, ही सरकारची कारवाई आहे. या कारवाईचा माझ्याशी काहीच संबंध नाही. तसंच कंगनाने शिवसेनाला बाबराची सेना म्हटलेय. पण बाबरी तोडणारे आम्हीच आहोत. ती आम्हाला काय म्हणतेय? असा टोलाही राऊतांनी तिला लगावला आहे.

यावेळी राऊतांना कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईच्या टायमिंगविषयीही प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना राऊत म्हणाले की, कारवाईच्या टायमिंगबाबतचे उत्तर केवळ मुंबई महापालिकेचे आयुक्त देऊ शकतील. जर कोणी कायदा मोडत असेल तर त्यावर कारवाई केली जाते. यावेळी पक्षाकडे याविषयी माहिती असणे आवश्यक नसल्याचंही राऊत म्हणाले आहेत.

यासोबतच शिवसेनेने सूडाच्या भावनेती कंगनाविरोधात कारवाई केल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ही कारवाई सूडाच्या भावनेतून करण्यात आलेली नाही. दरम्यान मुंबई महापालिकेच्या कारवाईचे प्रकरण आता उच्च न्यायालयाच गेले आहे. तिथेच पालिका उत्तर देईल असंही स्पष्टीकरण राऊतांनी दिलं आहे.

… म्हणूनच माझी मुंबईत आता पीओके झाली आहे

कंगनाच्या कार्यालयाची बीएमसीकडून तोडफोड सुरू करण्यात आली. यानंतर कंगनाने ट्विट केले. पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे फोटो शेअर करत कंगनाने ‘बाबर आणि त्याचे सैन्य’ असे लिहिले होते. तसेच मी कधीच चुकीची नव्हते. माझे शत्रू वारंवार सिद्ध करत असतात की, माझी मुंबईत आता पीओके झाली आहे, असे ट्विट कंगनाने केले होते.

हे मंदिर पुन्हा बनवले जाईल – कंगना

कंगनाने ट्विट करत म्हटले की, ‘मणिकर्णिका फिल्म्जमध्ये पहिली फिल्म अयोध्याची घोषणा झाली, ही माझ्यासाठी एक इमारत नाही तर राम मंदिर आहे, आज येथे बाबर आला आहे. आज इतिहास पुन्हा एकदा पुनरावृत्ती करेल. राम मंदिर तोडले जाईल. पण लक्षात ठेव बाबर हे मंदिर पुन्हा बनवले जाईल, हे मंदिर पुन्हा बनवले जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम…’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!