भारतात पुन्हा पब्जी करणार कमबॅक


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.९: भारत सरकारने गेल्या आठवड्यात ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. यात प्रसिद्ध बॅटल रॉयल गेमचाही (पब्जी) समावेश होता. हा गेम बॅन झाल्यानंतर गेमिंग कम्यूनिटी चिंतेत होती, मात्र आता कंपनीने त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ब्लूहोल अंतर्गत, मूळ गेमिंग पब्जी कॉर्पोरेशनने अधिकृत निवेदन जारी केले आहे. पब्जी कॉर्पच्या मते, त्यांना संपूर्ण परिस्थितीची जाणीव आहे आणि बंदीच्या संपूर्ण प्रकरणावर सक्रियपणे विचार केला जात आहे. आज पब्जीचा मोबाइल अपडेटही आला आहे. 

त्याचबरोबर भारतातील पब्जी मोबाईलवरील टेनसेंट गेम्सचे कंट्रोल संपुष्टात आणले जाईल आणि आता याची जबाबदारी पब्जी कॉर्पोरेशन घेणार असल्याचे सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे की मूळ दक्षिण कोरियातील गेमिंग कंपनी आता जबाबदारी स्वीकारत आहे आणि असे झाल्यास देशातील पब्जी वरील बंदी लवकरच काढून टाकली जाऊ शकते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!