
थेट WhatsApp वर मिळवा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी ‘नागरी बँका व पतसंस्था’ मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाल्यानिमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ३ नोव्हेंबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी ‘नागरी बँका व पतसंस्था’ मतदारसंघातून माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भाजपचे आक्रमक नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील या ऐतिहासिक आणि मोठ्या यशानिमित्त उद्या, बुधवारी (दि. ४ नोव्हेंबर २०२६) सुरवडी येथील ‘रॉयल गार्डन’ येथे एका विशेष ‘आभार सभेचे’ आणि अभिनंदनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आनंददायी आणि अभिमानाच्या प्रसंगी रणजितदादांच्या बिनविरोध निवडीबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात येणार असून, या प्रवासात भक्कम साथ देणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे आभार मानले जाणार आहेत. उद्या सकाळी ठिक १०:३० वाजता या सभेला सुरुवात होईल.
या सभेच्या निमित्ताने सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. सकाळी १०:३० वाजता अभिनंदनपर सभा पार पडल्यानंतर सर्व उपस्थित प्रमुख कार्यकर्ते आणि मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक विजयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी फलटण व परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी ‘रॉयल गार्डन, सुरवडी’ येथे आवर्जून उपस्थित राहावे, असे सस्नेह निमंत्रण संयोजकांच्या वतीने देण्यात आले आहे.





