फलटण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जैविक खते व कीटकनाशक निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत फलटण येथील उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत अनुभवाधारित कौशल्य विकास उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०३ नोव्हेंबर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-२०२०) नुसार विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित कृषी कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि जैविक कीटकनाशके निर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे.

जैविक निविष्ठांच्या निर्मितीचे प्रशिक्षण

रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा संतुलित वापर, जमिनीचे आरोग्य आणि पर्यावरणीय शाश्वतता या गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना Acetobacter, PSB आणि KMB यांसारख्या जैविक खतांच्या संवर्धनाचे तंत्रज्ञान शिकवले जात आहे. तसेच Trichoderma, Pseudomonas आणि Bacillus आधारित जैविक बुरशीनाशकांचे उत्पादन व गुणवत्ता नियंत्रणाचे धडे दिले जात आहेत.

कीड व्यवस्थापनासाठी जैविक पर्याय

पिकावरील किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांना पूरक म्हणून Metarhizium आणि Beauveria या जैविक कीटकनाशकांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून समजून सांगितले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सूक्ष्मजीव ओळख, संवर्धन आणि गुणवत्ता तपासणीची कौशल्ये विकसित होत आहेत. हा उपक्रम प्रा. एम. जे. शहा, प्रा. एस. पी. बनकर, प्रा. एम. व्हि. पवार व प्रा. एम. एस. बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राबविला जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!