रणजितसिंह दिलीपसिंह भोसले खासदारांच्या सोबत?; शहरात चर्चांना उधाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 26 मार्च 2024 | फलटण | खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघाची पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर फलटण शहरांमध्ये अनेक दिग्गज नेते व कार्यकर्ते हे खासदार रणजितसिंह यांच्या संपर्कात असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून समोर येत होती. आज माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांचे चिरंजीव तथा महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह दिलीपसिंह भोसले हे थेट खासदार रणजितसिंह यांच्यासोबत माळशिरस येथे दिसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

दिलीपसिंह भोसले यांची भूमिका नक्की बदलली आहे का ? दिलीपसिंह भोसले आगामी काळामध्ये खासदार रणजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली कामकाज करणार का ? असे विविध प्रश्न तयार होत आहेत.


Back to top button
Don`t copy text!