पराभव झाल्यानंतर सुध्दा जनतेची नाळ तुटू न देणारा नेता म्हणजे “रणजितसिंह” : कामगार मंत्री ना. सुरेश खाडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२४ | फलटण | निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुध्दा जनतेची नाळ तुटू न देणारा नेता म्हणून काम करीत आहेत. पाच हजार मुलींना सायकल वाटप करून मनाचा मोठेपणा दाखवला आहे. मुलींच्या व्यथा समजुन घेऊन सर्व स्थरातील या मध्ये कोणतेही राजकारण न पाहता तुम्ही मदत करत आहात. या मतदारसंघातील जनतेची विकासाची कामे करीत आहात; मला तर असे वाटते की आज ही तुम्ही जनतेच्या मनातले खासदार आहे. मतदार संघासाठी प्रचंड मोठी कामे दादा तुम्ही केली जनता तुमचे उपकार विसरणार नाही. भविष्यात फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा भाजपचा पर्यायाने तुमचा झाल्या शिवाय राहणार नाही; असे मत कामगार मंत्री ना. सुरेश खडे यांनी व्यक्त केले.

फलटण येथे महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात गोर गरीब गरजू मुलींना १५००० मोफत सायकल वाटप करण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच भाग म्हणून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ५००० गरजु मुलींना सायकल वाटप कार्यक्रम कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांच्या शुभहस्ते शुभारंभ मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्या सायकल मुलींना वाटप केले आहे. त्या मुली शिकुन मोठ्या झाल्या पाहिजेत मुलींनाही रस्त्यावर जाताना सावकाश सायकली चालवा अशा सूचना केल्या.

यावेळी बोलताना रणजितसिंह म्हणाले की; फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्या प्रचंड प्रेम केले आहे. भविष्यात तालुक्याचे विकासासाठी जनतेचा आशिर्वाद मला द्या. तालुक्यातील जनतेला अभिमान वाटेल असे ही काम करेल. तालुक्यातील युवकांसाठी रोजगाची संधी उपलब्ध करणार आहे.


Back to top button
Don`t copy text!