श्रीराम कारखान्याच्या निवडणुक स्थगितीनंतर रणजितदादांची आज पत्रकार परिषद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 14 मार्च 2025। फलटण । आज दि. १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. ही पत्रकार परिषद काल श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुक प्रक्रियेवर स्थगिती आल्यानंतर घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक प्रक्रियेवर आलेली स्थगिती ही तालुक्यासाठी एक महत्त्वाची घटना आहे. या स्थगितीमुळे कारखान्याच्या आगामी निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अशा वेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी पत्रकार परिषद घेतल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे राजकीय क्षेत्रातील एक युवा नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा वापर करून ते कारखान्याच्या निवडणुक प्रक्रियेत कोणती भूमिका पार पाडतील याची उत्सुकता सर्वांना वाटत आहे. आमदार सचिन पाटील यांच्या सोबतच्या या पत्रकार परिषदेतून त्यांच्या भावी योजना आणि कारखान्याच्या निवडणुक प्रक्रियेवरील त्यांचे विचार समोर येण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!