राजाळे येथे ‘रानभाजी महोत्सव २०२०’ संपन्न


स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, व  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारा संयुक्त विद्यमाने राजाळे ता. फलटण येथे ‘रानभाजी महोत्सव २०२०’ चे आयोजण करण्यात आले होते. 

राजाळे येथील भोईटे वस्ती येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचा प्रारंभ जिल्हा परिषद सदस्या सातारा सौ. कांचनमाला निंबाळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच मारुती मोहिते, माजी सरपंच संभाजी निंबाळकर, माजी सरपंच महेश निंबाळकर, पोलीस पाटील महेश शेडगे, तालुका कृषिअधिकारी सुहास रणसिंग, मंडल कृषि अधिकारी अमोल सपकाळ, पूजा दुदुसकर, प्रगतशील शेतकरी निळकंठ धुमाळ, अमोल भोईटे, कृषि पर्यवेक्षक रवी बेलदार, दत्तात्रय एकळ, मल्हारी नाळे, कृषि सहायक सचिन जाधव, गौरव यादव, सोमनाथ पवार, तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन नेवसे, कृषि तंत्रज्ञान सहाय्यक सुरज फुले, कृषि मित्र कमलाकर भोईटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सदर रानभाजी महोत्सवामध्ये शेतातील अळू, कुर्डू, शेवगा, तांदुळजा, अंबाडा, केना, चिघळ, गुळवेल, करटोली, टाकाळा, बांबू, डेसा, आगाडा, पाथरी,पानांचाओवा अश्या १७ विविध प्रकारच्या  रानभाज्यांचे नमुने प्रदर्शित करण्यात आले होते. यावेळी रानभाजी महोत्सवांमध्ये औषधी गुणधर्म  उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या, त्यांचे मानवी जीवनातील महत्त्व व बाजार पेठ उपलब्ध होणे, हाच  रानभाज्या महोत्सव आयोजना मुख्य उद्देश असल्याचे तालुका कृषि अधिकारी सुहास रणसिंग यांनी सांगितले. 

कृषि विभागा मार्फत आयोजित रानभाजी महोत्सव 2020 हा उपक्रम स्तुत्य असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सौ कांचनमाला निंबाळकर यांनी सांगितले. रानभाज्या महोत्सवात सहभागी शेतकरी शिवाजी भोईटे, लालासो भोईटे, मधुकर सोनवलकर, सचिन फडतरे, चंद्रकांत शेडगे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषि सहाय्यक सचिन जाधव यांनी केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!