श्रीमंत रामराजे महायुतीचेच काम करणार?; देवेंद्र फडणवीसांच्या सोबत बैठक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 19 मार्च 2024 | मुंबई | माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुती अंतर्गत पेच प्रसंग निर्माण झाला आहे. तो सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या “सागर” या निवासस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत संयुक्तिक बैठक आयोजित केली होते.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट हा फलटणमध्ये महायुतीचे काम करणार नाही; अशी भूमिका समोर येत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सविस्तर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील “सागर” या निवासस्थानी सर्वप्रमुख मान्यवरांचे संयुक्तिक बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्की काय तोडगा काढला आहे ? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीपूर्वी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सुद्धा त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!