राजु मारुडा यांचे आंबेडकर चळवळीत भिमसैनिक म्हणून निष्ठापूर्वक काम : अशोकराव गायकवाड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, फलटण दि.10 : राजु मारुडा यांनी गेले 30 वर्षे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या माध्यमातून फुले – शाहु – आंबेडकर चळवळीमध्ये सर्वसामान्य भिमसैनिक म्हणून अखंडपणे व निष्ठापूर्वक कार्य केले आहे, असे गौरवोद्गार आर.पी.आय.चे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी काढले.

येथील काठियावाडी मेहतर समाज विकास मंडळाचे कार्याध्यक्ष राजु मारुडा यांचा आर.पी.आय.च्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काठीयावाडी मेहतर (रुखी) समाज विकास मंडळ व अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस यांच्यावतीने अशोकराव गायकवाड यांच्या हस्ते सत्कार समारंभ  आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गायकवाड बोलत होते.

यावेळी आर.पी.आय.चे विजय येवले, जयवंत वीरकायदे, मुन्ना शेख, संजय निकाळजे, श्रीकांत निकाळजे, लक्ष्मण अहिवळे, सतिश अहिवळे, तेजस काकडे, विमलताई काकडे, राखी कांबळे, अशोक मारुडा, लाला डांगे, देवसात वाळा, सुरज सोळंकी, किरण डांगे, हिरा वाळा, धनंजय वाळा, सुनिल मारुडा, आनंदा डांगे, किरण मारुडा, अमन वाळा, मयुर मारुडा, विशाल मारुडा, बाबु वाघेला यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मनोज मारुडा, रमेश वाघेला यांनी मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!