शेतकरी आंदोलन दडपशाही विरोधात कृषिपदवीधर युवाशक्ती मैदानात


स्थैर्य, फलटण दि.10 : दिल्लीत सुरु असणार्‍या आंदोलनात शेतकर्‍यांवर होणार्‍या दडपशाही विरोधात आवाज उठवन्यासाठी कृषीपदवीधर युवाशक्ती संघटनेने फलटण शहरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळयास अभिवादन करून निषेध मोर्चाद्वारे आवाज उठवला.

विश्‍वाचा पोशिंदा असणार्‍या शेतकर्‍यांना राजधानी दिल्लीत येण्यापासून रोखत असताना केंद्र सरकारने बळाचा वापर करुण शेतकर्‍यांना अमानुष वागणूक दिली. हुकुमशाही प्रवृतिचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पद्धतीने हे आंदोलन दडपन्याचा प्रयत्न सुरु आहे ते पाहता केंद्र शासनाला धड़ा शिकविन्याची ही वेळ आहे  ईथून पुढे शेतकरी राजाच्या केसाला जरी धक्का लागला तर शेतकरी पुत्र असणारे कृषिपदवीधर शांत बसणार नाहीत असा जाहिर इशारा या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष जयदिप ननावरे यांनी दिला.

कृषिपदवीधर युवाशक्ती संघटना फलटण तालुका कार्यकारिणीने या मोर्चाचे आयोजन केले होते. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक सदस्य गिरीष बनकर यांनी तड़ाखेबाज भाषण करून शेतकरी विरोधी शक्तीचे वाभाड़े काढले.

फलटण तालुक्यातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सदर मोर्च्यात सक्रिय सहभाग नोंदविला याप्रसंगी रा.स.प. शेखर खरात, शिवसेना तालुका प्रमुख स्वप्निल मुळीक, शिवसेना शहर प्रमुख रणजित कदम, राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हा समन्वयक महेंद्र सूर्यवंशी बेडके, माऊली कदम, नंदकुमार काकडे, जिल्हा अध्यक्षा माथाडी सेना सौ.जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप झणझणे, मनसे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे आदी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भाषणे केली.

या मोर्चाचे आयोजक म्हणून कृषिपदवीधर युवाशक्ती संघटनेचे सातारा जिल्हा निरीक्षक किरण जाधव, जिल्हा संघटक आदित्य पाटनकर, जिल्हा प्रवक्ते प्रसाद रणनवरे, जिल्हा विद्यार्थी संघटक विश्‍वजीत काटे, जिल्हा उपाध्यक्ष शुभम थोरात, तालुका युवती अध्यक्षा जिजाई फड़तरे, नेहा थोरात, निशा माळी, पश्‍चिम महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष शुभम गाडेकर, पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील चांदगुडे, वैभव दानवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!