आमदार निवडीमुळे राजे गटातील दिग्गज रणजितदादांच्या गळाला?; रात्री पुण्यात खलबते

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात सचिन सुधाकर पाटील हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. आमदार बदल झाल्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात महायुतीमध्ये कामकाज करण्यासाठी फलटण शहरासह तालुक्यातील राजे गटाच्या दिग्गज नेत्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क केला असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांच्या कडून येत आहे.

“स्थैर्य”ला हाती लागलेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी पुणे येथे राजे गटातील फलटण शहर व ग्रामीण भागातील प्रमुख नेतेमंडळी दिग्गज नेतेमंडळी यांनी आगामी पुढील राजकीय वाटचालीसाठी चर्चा केली असल्याची माहिती हाती लागली आहे. येणाऱ्या काही दिवसात राजे गटातील नेतेमंडळींच्यासह एक मोठा गट माजी खासदार रणजितसिंह यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

येणाऱ्या काही दिवसात राजे गटातील दिग्गज मान्यवर हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात महायुतीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुद्धा झाली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!