राजाराम सातपुते ‘रियल अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
बारामती एमआयडीसीमधील व्ही. आर. बॉयलर सोल्युशनचे चेअरमन राजाराम सातपुते यांना २०२३ चा ‘रियल अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे, येथे १४ ऑक्टोबर रोजी गौतम कोतवाल यांनी लिहिलेल्या ‘रिअल अचिव्हर्स’ या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान लोकांचा कार्यपरिचय करून देणार्‍या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. तसेच शिक्षण व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राजाराम सातपुते यांचा पुस्तकामध्ये कार्य परिचय व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, रिअल अचिव्हर्स पुस्तकाचे लेखक गौतम कोतवाल, संजय दिवेकर, अध्यक्ष कै. एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय, सिद्धांत यादव, अध्यक्ष सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, मनीषा लोहोकरे, संचालक मातोश्री इंटरनॅशनल स्कूल वारजे, पृथ्वीराज प्लास्टिक प्रा. लि. चे चेअरमन दिनेश भागवत व मराठा सिक्युरिटी इंटेलिजन्सचे संचालक प्रवीण जगताप इतर मान्यवर उपस्थित होते.

बारामतीमध्ये बॉयलर अटेंडन्स म्हणून काम करीत असताना उद्योजक म्हणून कोणतेही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना अनुभव व जिद्दीच्या जोरावर स्वतःची व्ही. आर. बॉयलर सोल्युशन कंपनी स्थापन करून अनेक नामांकित व छोट्या-मोठ्या कंपन्यांना गुणवत्ता व दर्जात्मक कामे वेळेवर देऊन अनेकांना रोजगार निर्मिती प्राप्त करून दिली. या कार्याची दखल घेऊन ‘रियल अचिव्हर्स’ पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजक लेखक गौतम कोतवाल यांनी सांगितले.

उद्योजक यांनी मनुष्यबळ व आर्थिक व्यसवस्थापन उत्कृष्ट ठेवावे, प्रसंगी पडेल ते काम करून समोरचा ग्राहक वेळेत संतुष्ट करावा, तरंच आणखीन ऑर्डर वाढतील व यश सहज प्राप्त होणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना राजाराम सातपुते यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!