सातारा तालुक्यातील दोन दारु अड्डयावर छापा


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी दारु अड्डयावर छापा टाकून २ हजार ५२० रुपये किमतीची दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ठोसेघर, ता. सातारा येथे राहत्या घराच्या आडोशाला तेथीलच शंकर रामचंद्र बेडेकर वय ५८ यांच्याकडून १ हजार ४०० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. दुसऱ्या घटनेत राजापुरी, ता. सातारा येते घराच्या आडोशाला तेथीलच आनंदा तुकाराम मोरे याच्याकडून १ हजार १२० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.


Back to top button
Don`t copy text!