• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

राहोची २० कोटी रुपयांची निधी उभारणी

भौगोलिक उपस्थिती वाढवण्यासाठी भांडवलाचा वापर करणार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 14, 2023
in इतर

दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२३ । मुंबई । राहो या भारतातील अग्रगण्य डिजिटल फ्रेट नेटवर्कने प्री-सीरीज ए फेरीसाठी गेल्या वर्षभरात ४ पट मुल्यांकनात २० कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. या फेरीचे नेतृत्व इन्फ्लेक्शन पॉइंट व्हेंचर्स (आयपीव्ही), रूट्स व्हेंचर्स, ब्लूम फाऊंडर्स फंड आणि विजय शेखर शर्मा, कुणाल शाह, के कृष्ण कुमार, व्यंकटेश विजयराघवन, असीम खुराना यांसारख्या प्रमुख एंजल्सनी केले. संपूर्ण देशात राहोची भौगोलिक उपस्थिती वाढवण्यासाठी आणि फ्रेट मॅचिंग स्वयंचलित करण्यासाठी डेटा सायन्स व एमएल क्षमता मजबूत करण्याकरिता नवीन भांडवलाचा वापर केला जाईल.

राहोचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज म्हणाले, ‘‘भारतातील ट्रकर्स आणि ड्रायव्हर्सचे जीवन अधिक चांगले बनवण्याचे आमचे ध्येय कायम ठेवण्याचा आम्हाला आनंद होत आहे. या निधीच्या उभारणीसह आम्ही भारतातील अधिक भौगोलिक क्षेत्रांपर्यंत आमची पोहोच वाढवण्याची योजना आखत आहोत, तसेच आमची मालवाहतूक जुळवण्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आमची डेटा सायन्स व मशिन लर्निंग क्षमता प्रबळ करू. राहोमध्ये आम्ही सर्वांसाठी उज्वल भविष्य निर्माण करण्याप्रती कटिबद्ध आहोत.’’

विजय शेखर शर्मा म्हणाले, ‘‘मी इम्तियाज यांना १५ वर्षांहून अधिक काळापासून ओळखतो आणि मी ट्रकर्स व ड्रायव्हर्सच्या कल्याणासाठी राहोच्या मिशनमध्ये वैयक्तिकरित्या गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. डिजिटायझेशनमुळे अधिक उद्योगांवर परिणाम झालेला दिसत असल्याने ट्रकिंग मार्केटची कार्यक्षमता वाढवण्याची क्षमता प्रचंड आहे आणि मी राहोसोबत या राइडची सुरूवात करण्यास उत्सुक आहे.’’

गुरगाव-स्थित राहो चेन्नई, बेंगळुरू, कोईम्बतूर, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, कानपूर, कर्नाल यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये उपस्थितीसह भारतातील १५ हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे. नवीन निधीसह स्टार्टअपचा त्यांचे नेटवर्क आणखी विस्तारण्याचा आणि रिकामे अंतर कमी करण्यासाठी ट्रकिंग स्पेसमध्ये कार्यक्षमता वाढवण्याचा मनसुबा आहे.


Previous Post

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

पुरुष आमदाराची बदनामी झाली नाही का?; संजय राऊतांचा व्हायरल व्हिडिओवर खोचक सवाल

Next Post

पुरुष आमदाराची बदनामी झाली नाही का?; संजय राऊतांचा व्हायरल व्हिडिओवर खोचक सवाल

ताज्या बातम्या

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयागराजचे पथक २७ ते २९ या कालावधीत साताऱ्यात

मार्च 21, 2023

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत

मार्च 21, 2023

‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता तक्रारी कराव्यात – नितेश राणे

मार्च 21, 2023

पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम

मार्च 21, 2023

गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’

मार्च 21, 2023
वडूज ता.खटाव येथील भूमी अभिलेख कार्यालय फलका नजीक पडलेल्या रिकाम्या बाटल्या

वडूजच्या भूमी अभिलेखा कार्यालयातील रिकाम्या बाटल्याचे मोजमाप करणे कठीण?

मार्च 21, 2023

शुभम नलवडे ठरले आळजापूर गावचे सर्वात कमी वयाचे ‘युवा सरपंच’; गावात जल्लोष

मार्च 21, 2023

रजनीकांत खटके यांच्या बेमुदत साखळी उपोषणास शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युतीचा जाहीर पाठिंबा

मार्च 21, 2023

महिला बचत गट उत्पादित वस्तुंचे २४ ते २६ मार्च कालावधीत प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मार्च 21, 2023

उषा मंगेशकर यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

मार्च 21, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!