रब्बी पीककर्ज वाटपाचा वेग मंदावला; उद्दिष्टाच्या केवळ २५ टक्केच वितरण, शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

रब्बी हंगामातील पेरणीची लगबग सुरू झाली असतानाच पीककर्ज वाटपाचा वेग कमालीचा मंदावल्याचे चित्र समोर आले आहे. रब्बीसाठी ८०३ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असताना, आतापर्यंत प्रत्यक्ष २०१.६३ कोटी रुपयांचेच वितरण झाले असून हे प्रमाण उद्दिष्टाच्या केवळ २५ टक्के इतकेच आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १७ नोव्हेंबर : हंगामी पेरणीसाठी बियाणे, खते आणि शेतीकामांच्या खर्चासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची नितांत गरज असते. मात्र, बँकांच्या संथ कारभारामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. आकडेवारीनुसार, ७५ हजार ३७४ शेतकरी खात्यांना पीककर्ज देण्याचे नियोजन करण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळू शकला आहे.

शेतकऱ्यांची खासगी सावकारांकडे धाव घेण्याची भीती

बँकांकडून होणाऱ्या या विलंबामुळे ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. वेळेत भांडवल उपलब्ध न झाल्यास रब्बीच्या पेरणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, गरज भागवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांवर नाइलाजाने खासगी सावकारांकडून चढ्या व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ येत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पीककर्ज वाटपाला तातडीने गती द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!