सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; एकूण २१ परीक्षांपैकी ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा संधी मिळणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) जाहीर केले आहे. २८ जानेवारी ते १० जून २०२७ दरम्यान एकूण २१ सीईटी परीक्षा पार पडणार असून यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

स्थैर्य, सातारा , दि. १७ नोव्हेंबर : राष्ट्रीय स्तरावरील ‘जेईई’ मुख्य परीक्षेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. मागील वर्षापासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए/एमएमएस या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी दोन वेळा घेतल्या जात होत्या. या प्रयोगाला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता यंदा पीजीडीएम, पीजीसीएम, पाच वर्षीय एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम यांसह एकूण ११ अभ्यासक्रमांची सीईटी दोनदा घेण्यात येणार आहे.

पहिली परीक्षा बंधनकारक, दुसरी ऐच्छिक

विद्यार्थ्यांना पहिली सीईटी परीक्षा देणे बंधनकारक असेल, तर दुसरी परीक्षा ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाइल गुण असतील, तेच प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. तसेच यंदापासून तीन नवीन अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी घेतली जाणार असून, तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाची सीईटी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर वेळापत्रक आणि पुढील सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!