राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; तब्बल ८७ टक्के निरीक्षण विहिरींचे पाणी खालावले, सर्वेक्षणातून चिंताजनक चित्र समोर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या ताज्या निरीक्षणानुसार, महाराष्ट्रातील भूजलसाठ्याची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. राज्यातील ३,८१६ निरीक्षण विहिरींपैकी ३,३२१ विहिरींमधील पाणीपातळीत लक्षणीय घट नोंदवली गेली असून, सुमारे ८७ टक्के विहिरी तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. १७ नोव्हेंबर : राज्यात दुष्काळी परिस्थितीचे संकट अधिक गडद होत असल्याचे भूजल सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर २०२६ अखेर करण्यात आलेल्या पाहणीत ९६४ विहिरींची पाणीपातळी तीन मीटरपेक्षा अधिक खालावली आहे. यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागाला सर्वाधिक फटका बसला असून तेथील ८६२ विहिरींमधील पाणी कमी झाले आहे. त्याखालोखाल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात ६५०, पुणे विभागात ५५८, अमरावती विभागात ५३१, नागपूर विभागात ५३० आणि कोकणातील १९० विहिरींची पाणीपातळी घटली आहे.

अकरा वर्षांत पाणीपातळी घटणाऱ्या विहिरींमध्ये मोठी वाढ

२०१५ मध्ये राज्यातील २,२४६ निरीक्षण विहिरींमध्ये पाणीपातळी घटल्याची नोंद होती, मात्र आता हा आकडा ३,३२१ वर पोहोचला आहे. मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात भूजलावरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या संकटावर मात करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १८ हजार जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला असून, टंचाईग्रस्त १४० गावांसाठी २५ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!