आर.के.सी. कंपनीविरोधात उद्या फलटणमध्ये मूक मोर्चाचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १७ मे २०२३ | फलटण |
फलटणमधील अमीर शेख व गणेश लोंढे या तरुण मित्रांच्या गंभीर अपघातास व मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आर.के.सी. कंपनी व उपविभागीय अधिकारी प्रांत शिवाजी जगताप तसेच तहसीलदार समीर यादव यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याकरीता उद्या, दि. १८ मे २०२३ रोजी शहरात मूक मोर्चाचे आयोजन केल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या मोर्चात सहभागी होण्यासाठी फलटणकर नागरिकांनी सकाळी १०.०० वाजता आंबेडकर चौकात जमा व्हावे, असे सांगण्यात आले आहे. हा मोर्चा आंबेडकर चौक येथून तहसील कार्यालय येथे जाऊन निवेदन देऊन संपणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!