आळजापूर येथे आर. ओ. फिल्टर लोकार्पण, बक्षीस वितरण व मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा नोंदणी शिबिर संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
आळजापूर (ता. फलटण) येथे रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी आर. ओ. फिल्टर लोकार्पण सोहळा, घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण व मुख्यमंत्री मोफत तीर्थदर्शन यात्रा नोंदणी शिबिर हे कार्यक्रम संपन्न झाले.

या कार्यक्रमांना चित्रपट निर्माते श्री. धोंडीबा कारंडे, श्री. विलासराव नलवडे, पत्रकार श्री. ज्ञानेश्वर भोईटे, श्री. नितीन नलवडे (मा. उपसरपंच), श्री.चंद्रकांत पवार, श्री. दत्तात्रय केंजळे (व्हा. चेअरमन) व सौ. गीतांजली नलवडे (उपसरपंच), सौ. उज्ज्वला भंडलकार श्री. रामदास फडतरे, श्री. संदीप नलवडे, श्री. सागर काकडे, श्री. सुनील पवार, श्री. भरत नलवडे, श्री. सूरज मासुगडे, श्री. अमर नलवडे, श्री. अरुण नलवडे, श्री. हणमंत नलवडे व आरोग्य सेविका, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत स्टाफ व ग्रामस्थ महिला यांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!