सातारा-लोणंद महामार्गावर अवजड वाहतूक बंद; जाणून घ्या नवे मार्ग

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा-लोणंद महामार्गावरील वाढे आणि वडूथ येथील पुलांची स्थिती खालावल्याने सर्व अवजड वाहनांची वाहतूक २८ सप्टेंबरपासून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. 25 सप्टेंबर : सातारा ते लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील वाढे आणि वडूथ येथील वेण्णा व कृष्णा नदीवरील जुन्या दगडी कमानीच्या पुलांची स्थिती धोकादायक बनल्याने या मार्गावरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक २८ सप्टेंबरपासून इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.

पुलांची दुरवस्था आणि तात्पुरती बंदी

राष्ट्रीय महामार्ग ९६५ डी वरील वाढे व वडूथ येथील पूल हे जुने दगडी कमानीचे आहेत. पावसामुळे पुलांमधून पाणी पाझरणे, किरकोळ तडे जाणे आणि कमानीची झीज झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पाहणीत समोर आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि पुढील वर्षी समांतर नवीन पुलांचे काम पूर्ण होईपर्यंत २८ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपासून २० जून २०२७ पर्यंत ही अवजड वाहतूक बंद राहणार आहे, असे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले आहेत.

प्रवाशांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था

सातारा ते लोणंद आणि फलटण दरम्यान धावणाऱ्या अवजड वाहनांना पुणे-बंगलोर महामार्ग, शिरवळ, खंडाळा तसेच पुसेगाव आणि कोरेगाव मार्गे वळवण्यात आले आहे. फलटणकडून येणारी वाहने ताथवडे घाट किंवा आदर्की फाट्यावरून मार्गस्थ होतील. दरम्यान, सर्व प्रकारची हलकी वाहने, एसटी बसेस, स्कूल बसेस आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या पुलांवरून पूर्वीप्रमाणेच वाहतूक करण्याची पूर्ण मुभा देण्यात आली आहे.

Back to top button
Don`t copy text!