• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

क्वांटम एनर्जीद्वारे ‘क्वांटम बिझनेस’ ई – स्कूटरचे अनावरण

३ वर्षांत ९०,००० कि.मी.ची वॉरंटी; व्यावसायिक डिलिव्हरीसाठी उत्तम पर्याय

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
एप्रिल 6, 2023
in इतर

दैनिक स्थैर्य । दि. ०६ एप्रिल २०२३ । मुंबई । इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या डिझाईन, विकास, निर्मिती आणि विक्रीमध्ये विशेषता असलेल्या अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप, क्वांटम एनर्जीद्वारे व्यावसायिक डिलिव्हरीसाठी आदर्श ई – स्कूटर क्वांटम बिझनेसचे अनावरण करण्यात आले. क्वांटम बिझनेस रेंज ९९०००* रुपयांच्या आकर्षक किंमतीत सुरु होते. कंपनीने एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि काही एनबीएफसीसारख्या प्रमुख बँकांशी करार केला आहे, जेणेकरून ते फ्लीट ऑपरेटर आणि लास्ट माइल डिलिव्हरी कंपन्यांसाठी आकर्षक बनू शकेल.

ही आकर्षक दिसणारी आधुनिक व्यावसायिक इलेक्ट्रिक स्कूटर, १२०० व्हॉट्स उच्च-कार्यक्षमतेच्या मोटरद्वारे शक्तीचालित आहे ज्यामुळे ती, ५५ कि.मी. प्रतितास टॉपच्या वेगापर्यंत पोहोचू शकते आणि फक्त ८ सेकंदात, ० ते ४० कि.मी. प्रतितास सहज गती वाढवू शकते. क्वांटम बिझनेस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एका पूर्ण बॅटरी चार्जवर १३०* कि.मी. (*ड्रायव्हिंग पॅटर्नवर अवलंबून)ची एक अभूतपूर्व श्रेणी आहे, ज्यामुळे ती एकाधिक व्यावसायिक उपयोगांसाठी आदर्श बनते. अधिक महत्त्वाचे म्हणजे, या उत्पादनात रिमोट लॉक – अनलॉक; चोरी-विरोधी अलार्म; यूएसबी चार्जर; डिस्क ब्रेक; एलसीडी डिस्प्लेसह काही सेगमेंट -बेस्ट वैशिष्ट्ये आहेत.

क्वांटम एनर्जी लिमिटेडचे संचालक, चेताना चुक्कापल्ली म्हणाले, “भारतात, दुचाकी चालवणारे लोक वाहतुकीव्यतिरिक्त वस्तू वाहून नेण्यापासून ते दोन चाकांवर व्यवसाय चालवणे अशा विविध उद्देशांसाठी दुचाकींचा वापर करतात. बाजारातील ही कमतरता ओळखून, आम्ही क्वांटम एनर्जी येथे, आमच्या ई – स्कूटरमधील विश्वसनीयता आणि सुरक्षिततेवर जोर देत सूक्ष्म – गतिशीलता उद्योगात नवीन मानके निश्चित करण्याचा विचार करतो. आम्ही बी२बी फ्लीट कंपन्या, अंतिम मैल डिलिव्हरी कंपन्या, राइड शेअरिंग कंपन्या आणि बी२सीसह ग्राहकांच्या विस्तृत श्रेणीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी कमी किंमतीत बिझनेस चे अनावरण केले आहे. आम्हाला विश्वास आहे की या दुचाकीसारख्या आमच्या उत्पादनांचे मेहनती भारतीयांकडून कौतुक केले जाईल आणि आम्हाला या विभागात उद्योगाचा नेता म्हणून स्थान मिळेल.”

क्वांटम बिझनेसचे हे नवीन मॉडेल, एक सुधारित एलएफपीबॅटरी, शक्तिशाली हेडलॅम्प, आरामदायक राईडसाठी एक व्यापक आसन, बहुउद्देशीय वापरासाठी एक मजबूत कार्गो रॅक, मोठ्या फ्लॅट फूटबोर्डसह अधिक लोड आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे, चांगली स्थिरता आणि हाताळणीसाठी १२” लांब व्हीलबेस सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त, हे उत्पादन, ३ वर्षे किंवा ९०,००० कि.मी. बॅटरीच्या वॉरंटीद्वारे संरक्षित आहे.


Previous Post

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत बारा हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर

Next Post

वडूज नगरीमध्ये कामाचे बिल देण्यासाठी अपंग ठेकेदारांनी केले विष प्राशन

Next Post
अत्यावस्थेमध्ये खुर्चीवर बसून तडफडत असलेले बाळू सावंत

वडूज नगरीमध्ये कामाचे बिल देण्यासाठी अपंग ठेकेदारांनी केले विष प्राशन

ताज्या बातम्या

फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जून 8, 2023

श्रीराम कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : श्रीमंत संजीवराजे

जून 8, 2023

नवी मुंबई येथील बालाजी मंदिर राज्याचे नवे तीर्थस्थळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जून 8, 2023
अग्निशामक केंद्रा समोर वृषरोपण करताना अधिकारी व पदाधिकारी

पर्यावरण दिनी बारामती एमआयडीसी मध्ये वृषरोपण

जून 8, 2023
वृक्षारोपण करताना रोहिणी खरसे आटोळे व इतर

वडाच्या रोपट्याचे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी

जून 8, 2023
कटफळ येथे वृषरोपण करताना मान्यवर

कटफळ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी वृषरोपण

जून 8, 2023

प्रवचने – भगवंताचे अनुसंधान राखावे

जून 8, 2023

महावितरण चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

जून 8, 2023

‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

जून 8, 2023

सातारच्या जिल्हाधिकारी पदी जितेंद्र दुडी; रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली

जून 7, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!