सगाममध्ये सद्गुरू नियतकालिकाचे प्रकाशन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, कराड, दि. 6 : येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज-मध्ये 2019-20 या वर्षीच्या ‘सद्गुरू’ नियतकालिकाचा प्रकाशन समारंभ नुकताच झाला.  पत्रकार प्रमोद सुकरे यांच्या हस्ते या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने होते. यावेळी उपप्राचार्य एस. ए. पाटील, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. माधुरी कांबळे, डॉ. सावंत, प्रा. आर. वाय. पाटील, पर्यवेक्षक एस. एस. नांगरे उपस्थित होते.

प्रमोद सुकरे म्हणाले, सद्गुरू नियतकालिकेमुळे विद्यार्थ्यांना विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. अंकाचे मुखपृष्ठ उत्कृष्ट असून गद्य व पद्य यामध्ये चांगल्या विषयाची मांडणी केली आहे. प्राचार्य डॉ. राजमाने म्हणाले, सद्गुरूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण माध्यम मिळाले आहे. संपादकांनी अतिशय परिश्रमपूर्वक हा अंक तयार केला आहे. नियतकालिकाचे प्रमुख संपादक प्रा. डॉ. दिलीपकुमार कसबे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. रेश्मा देवेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एच. के. मांडके यांनी आभार मानले. यावेळी कॉलेजचे विविध विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी  उपस्थित होते.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!