स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

जालना-नांदेड समृद्धी जोडमहामार्गाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
April 9, 2021
in प्रादेशिक

स्थैर्य, मुंबई, दि. ०९: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड या नियोजित महामार्गाच्या प्रगतीचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विस्तृत आढावा घेतला.

येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात  झालेल्या आढावा बैठकीला श्री. चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, महामंडळाचे महाव्यवस्थापक (जमीन) डॉ. भारत बास्टेवाड आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या १४ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून समृद्धी महामार्ग उभारणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या प्रकल्पासाठी सर्वेक्षण, तांत्रिक, अभियांत्रिकी व वित्तीय सुसाध्यता अहवाल आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. ही कामे सध्या प्रगतीपथावर असून, आढावा बैठकीत यासंदर्भात अशोक चव्हाण यांना विस्तृत माहिती देण्यात आली.

या महामार्गासाठी सुमारे २ हजार हेक्टर इतके भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन व प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्याबाबतची निविदा कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. या महामार्गासाठी पर्यावरण विभागाची मान्यताही घ्यावी लागणार आहे.

सुमारे १७८ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी सुमारे १२ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. नांदेड-औरंगाबादमधील प्रवासासाठी सध्या पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या अडीच ते तीन तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे नांदेडसह परभणी व हिंगोली जिल्ह्याला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी थेट द्रुतगती संपर्क मिळणार आहे. या तीनही जिल्ह्यातून मुंबई व औरंगाबाद येथे जाण्यासाठी कमी वेळ लागणार असून, त्यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, प्रवासी अशा सर्वच घटकांना त्याचा लाभ होईल.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

Next Post

केंद्र सरकार राईस मिलर्सच्या विरोधात नाही, त्यांच्या मागण्यांबाबत लवकरच मार्ग काढू – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

Next Post

केंद्र सरकार राईस मिलर्सच्या विरोधात नाही, त्यांच्या मागण्यांबाबत लवकरच मार्ग काढू – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,024 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा

April 12, 2021

‘५० वर्षावरील कलाकारांसाठी मासिक मानधन योजना’ विहित प्रक्रियेनुसारच – सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

April 12, 2021

भीती न बाळगता लस घ्या – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

April 12, 2021

मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत : पालकमंत्री छगन भुजबळ

April 12, 2021

राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आदींशी चर्चा करून परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

April 12, 2021

नेस्को संकुलात आणखी १५०० खाटांची सुविधा; कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

April 12, 2021

बारावीची परीक्षा मे अखेरीस तर १० वीची परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबतचे नियोजन आणि परिपूर्ण तयारी करावी – मुख्यमंत्री

April 12, 2021

फलटण तालुक्यातील १५७ तर सातारा जिल्ह्यातील १०१६ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १० बाधितांचा मृत्यु

April 12, 2021

लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 12, 2021

माजी आमदार पास्कल धनारे यांच्या निधनाने आदिवासींचा सेवक गमावला – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी अर्पण केली श्रद्धांजली

April 12, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.