
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ७ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
जिंती येथील राजेगटाच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
श्री. बाळासाहेब धोंडीबा रुपनवर (मा. उपसरपंच, ग्रामपंचायत जिंती), श्री. सुनील सोपान शिंदे (संचालक, जिंती विकास सोसायटी), श्री. सदाशिव रुपनवर, श्री. फिरोज तांबोळी, श्री. दिलीप ढेंबरे या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी धनंजयदादा साळुंखे-पाटील, डी. के. आण्णा पवार, विक्रमआप्पा भोसले, अमित रणवरे, काकासाहेब रणवरे, सुधीर रणवरे, सुनील पोतेकर, शर्मिलाताई रणवरे, प्रमोद रणवरे, विठ्ठल कुदळे, असिफ तांबोळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
