
दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । सातारा । मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या 10 वाहनांचा जाहिर ई – लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कराड येथे दि. 30 जून 2022 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे, ही वाहने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कराड येथील आवारात दि. 23 ते 30 जून 2022 रोजी कार्यालयीन वेळेत पहाणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. असे कराधान अधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कराड यांनी कळविले आहे
ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा. व प्रांत अधिकारी, तहसिलदार, कराड. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कराड यांच्या सुचना फलकावर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे.
जाहिर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 23 ते 30 जून 2022 या कालावधीत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध असेल, ई-लिलावात भाग घेणाऱ्या प्रत्येक इच्छूकांनी रु.50 हजार रक्कमेचा डी.डी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कराड या नावे अनामत रक्कमेच्या डीमांड ड्राफ्टसह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्राच्या प्रती ,नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी व ॲप्रुवल करुन घेणेसाठी सादर करणे गरजेचे आहे. लिलावामध्ये विक्री करावयाच्या वाहनांचे ठिकाण तसेच अटी व शर्ती इत्यादी माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लिलावाबाबतची माहिती व वेळापत्रक ई लिलाव पोर्टल www.eauction.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कराड यांनी कळविले आहे.