
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. 14 ऑगस्ट 2024 | फलटण | शासनाच्या महसूल व वन विभागाच्या माध्यमातून उत्कृष्ठ अधिकारी म्हणून जिल्हास्तरीय पुरस्कार हा फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना जाहीर झाला असून याचे वितरण उद्या म्हणजेच स्वातंत्र्य दिनी दि. 15 ऑगस्ट रोजी सातारा येथे संपन्न होणार आहे.
फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे कामकाज अतिशय उत्कृष्ट असून सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. शासनाच्या विविध योजना ह्या तळागळात राबवण्याचे कामकाज प्रांताधिकारी ढोले हे नेहमीच करत असतात. फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या कामकाजामध्ये त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
