प्रधानमंत्री पीक विमा योजनेची चित्ररथाद्वारे प्रसिद्धी


दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । सातारा । खरीप हंगाम 2022 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी भारतीय कृषि विमा कंपनी मार्फत जिल्ह्यात फिरत्या चित्ररथाचे नियोजन केले असून या चित्ररथाला प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी हिरवा झेंडा दाखवून चित्ररथ पाटणकडे मार्गस्त केला.

या प्रसंगी तंत्र अधिकारी (सांख्यिकी) संतोषकुमार बरकडे, तंत्रसहायक (सांख्यिकी) विनोद नलावडे, जिल्हा विमा प्रतिनिधी अशोक मुळे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. राऊत म्हणाले पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंत विमा हप्ता भरुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. खरीप सातारा जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व कांदा या पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेत करण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी भारतीय कृषि विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधी अथवा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 18004195004 तसेच कृषि विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. राऊत यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!