महिला सक्षमीकरणासाठी लघुउद्योगांना चालना – पालकमंत्री यशोमती ठाकूर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, अमरावती, दि. 27 : असंघटित क्षेत्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळवून देण्यासाठी लघु उद्योग, छोटे व्यवसायाला चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. कोरोनाच्या काळातही व्यवसायाना चालना देऊन, तसेच विविध योजनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

अमरावती येथील मायनॉरिटीज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे एस.के.प्रॉडक्शन अगरबत्ती उद्योगाचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमंती ठाकूर यांच्या हस्ते झाले.त्यावेळी त्या बोलत होत्या.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, मायनॉरिटीज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे अगरबत्ती व्यवसायाचा शुभारंभ आज होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या उद्योगामुळे अल्पसंख्याक समाजातील महिला भगिनींना रोजगार मिळून आर्थिक स्थैर्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला ही कुटुंबाचा आधार असते. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली की कुटुंबाची प्रगती होते. अल्पसंख्याक भगिनींना रोजगार मिळवून देण्यासाठी लघुउद्योग व व्यवसायांचे जाळे निर्माण होणे आवश्यक आहे. या दृष्टीने चेंबर्सने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. अशा उपक्रमांना शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!