फलटणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांची खलबते; मतदारसंघाचा घेतला आढावा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 20 ऑक्टोबर 2024 | फलटण | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. त्यामध्येच आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आज फलटण दौऱ्यावर आले होतें यावेळी त्यांनी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत मतदारसंघाचा आढावा घेतला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ उद्योजक श्रीमंत बंटीराजे खर्डेकर – निंबाळकर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानिमित्त कुटुंबीयांना सांत्वन पर भेटीसाठी फलटण येथे आले होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके यांच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत इतंभुत माहिती घेतली.

गतक काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षांमध्ये विद्यमान आमदार दीपक चव्हाण व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा प्रवेश झाला होता. त्यानंतर फलटण तालुक्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून नक्की पुढे जात असताना कोणती भूमिका घ्यायची? याबाबत माहिती घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची संवाद साधला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!