सातार्‍यात मटका अड्ड्यावर छापा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, सातारा, दि. 26 : सातारा शहरातील मंगळवारपेठ येथील काशीविश्‍वेश्‍वर मंदीराच्या आडोशास कल्याण मटका नावचा जुगार चालवणार्‍या एकास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. 

याबाबत माहिती अशी, मंगळवार पेठेतील मंदिराच्या अडोशाला एकजण मटका व्यवसाय करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याठिकाणी छापा टाकला असता संशयीत स्लीपबुकमध्ये काहीतरी आकडे लिहीत बसलेला दिसला. पोलिसांची चाहुल लागताच तेथे जमलेले लोक गर्दीचा फायदा घेवुन पळुन गेले. पोलिसांनी आकडे लिहिणार्‍यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव धनंजय अनंत कुलकर्णी वय- 52 वर्षे रा 325 यादोगोपाळपेठ सातारा असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केली असता हा मटका यासीन इक्बाल शेख रा -426 शनिवारपेठ सातारा याचा असुन त्याचेकडे मी 350 रुपये हजरीवर मटका एजंट म्हणुन कामास असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून 610 रुपये रोख, एक पांढरे स्लिपबुक जप्त केले. यानुसार दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!