कोरोना लशीसाठी पंतप्रधानांची धडपड, नरेंद्र मोदी स्वत:च करणार सुरक्षिततेची खात्री

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२७: प्रत्येकाचं
लक्ष आता कोरोना लशीकडे लागून आहे. पुढील वर्षात कोरोना लस मिळण्याची आशा
आहे. त्या दिशेनं मोदी सरकारनंदेखील हालचाली सुरू केल्या आहेत. स्वत:
पंतप्रधान नरेंद्र मोदी लशीच्या सुरक्षिततेची खात्री करणार आहेत. यासाठी
देशात जिथं या कोरोना लशी तयार केल्या आहेत तिथं भेट देणार आहेत.

सर्वाधिक आशा आहेत त्या ऑक्सफर्ड,
अ‍ॅस्ट्रेझेनका आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लशीकडून.
त्यामुळे मोदी शनिवार, दि. 28 नोव्हेंबरला पुण्याच्या दौ-यावर येणार आहेत.
सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव
यांनी पंतप्रधानांच्या दौ-यासाठी तयारी सुरू झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं
आहे.

अहमदाबाहून पंतप्रधान मोदींचे शनिवारी
दुपारी 12 वाजून 25 मिनिटांला पुणे विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरूनच ते
थेट सीरम इन्स्टिट्यूटला हेलिकॉप्टरनं रवाना होतील. दुपारी 1 वाजून 05
मिनिटं ते 2 वाजून 05 मिनिटं या एक तासांच्या कालावधीत ते सीरम
इन्स्टिट्यूटला भेट देतील. भेटीदरम्यान ते संबंधित अधिका-यांकडून कोरोना
लशीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ते समजून घेणार आहेत. नंतर ते पुन्हा
विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांला पुणे विमानतळावरून
तेलंगाणाकडे रवाना होतील.

अल्पवयीन भाचीस मामानेच नेले पळवून; दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल

भारतात लशीची दुसरी आशा आहे ते मेड इन
इंडिया कोरोना लस कोवॅक्सिनकडून. जी हैदराबादमधील भारत बायोटेकनं तयार केली
आहे. 29 नोव्हेंबरला रविवारी मोदी भारत बायोटेकमध्ये जाऊन तिथं लशीची
महिती घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-यानंतर ४
डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन तिथं
सुरू असलेल्या कोरोना लशीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.
कोरोना लशीकरणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलण्याची तयारी करत आहे. या संदर्भात
सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली जाऊ शकते. लसीकरण
फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

लसीकरण फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरू
होण्याची शक्यता आहे. आगामी बजेट 2021 मध्ये रोडमॅप जाहीर केला जाऊ शकतो.
या अहवालाच्या मते सरकारने यासंदर्भात संपूर्ण आराखडा तयार केला आहे आणि
अ‍ॅस्ट्रजेनिकामधून मोठ्या प्रमाणात लस घेण्याची तयारी आहे.

असा अंदाज वर्तवला जात आहे की, देशातील
एका नागरिकाला कोरोना लस देण्यासाठी 6 ते 7 डॉलर अर्थात जवळपास 500
रुपयांएवढा खर्च येईल. यामुळेच 130 कोटी लोकांना कोरोना लस देण्यासाठी
सरकारने 500 अब्ज रुपयांचे बजेट निश्चित केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या
शेवटी या अर्थसंकल्पाची व्यवस्था केली जाईल. त्यानंतर लस देताना निधीची
कमतरता भासणार नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!