भारताचे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांची जयंती “शिक्षक दिन” म्हणून बंकटस्वामी विद्यालयात साजरी


दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । पाटोदा । बंकट स्वामी विद्यालय खडकी घाट येथील शाळेत डॉ. राधाकृष्णन यांची जयंती “शिक्षक दिन” म्हणून साजरी करण्यात आला. कार्यक्रमाचा श्रीगणेशा डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने शाळेचे मुख्याध्यापक मा. संजय सावंत सर आणि ज्येष्ठ शिक्षक मा. उंदरे सर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री आनेराव सर यांनी केले. नंतर वर्ग 5 वी ते वर्ग 10 वीच्या काही विद्यार्थी विद्यार्थिनींचे शिक्षक दिनानिमित्त डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर आधारित भाषणे झाली. काही शिक्षक वृंदानीही विद्यार्थ्यांना डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली. श्री उंदरे सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय सावंत सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षका विषयी आपुलकी असावी आदर असला पाहिजे, शिक्षकाची प्रतिष्ठा समाजात कमी होत चालली आहे हे सांगितले खरं तर भारताची पिढी घडवणाऱ्या शिक्षकाला अतिशय मानाचे स्थान समाजात असले पाहिजे असे सांगून समाजात शिक्षक नसते तर! काय झाले असते? हे विद्यार्थ्यांना विचारले सर्वांनी शिक्षकाशिवाय तरणोपाय नाही हे सांगितले.म्हणून शिक्षक आपल्या भारताचा आधारस्तंभ आहे त्याला समाजाने मानाचे स्थान दिले पाहिजे चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला पाहिजे हे सांगितले. श्री सुपेकर सर, श्री मोरे श्री खाकरे सर, श्री कुरे सर, बनसोडे सर श्री कानडे आणि श्री अनंत्रे सेवक शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश बापू भोसले यांनी केले तर आभार श्री आनेराव सर यांनी मांनले आणि कार्यक्रम संपला.


Back to top button
Don`t copy text!