टीमलीज एडटेकचा अहवाल सादर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ११ एप्रिल २०२३ । मुंबई । टीमलीज एडटेक या भारतातील अग्रगण्य अध्ययन सोल्युशन प्रदाता कंपनीने अहवाल ‘रिटर्न ऑफ कॉर्पोरेट लर्निंग इन्व्हेस्टमेंट्स’ सादर केला आहे. हा अहवाल कॉर्पोरेट शिक्षण व विकास उपक्रम -इन्व्हेस्टमेंट वि. आरओआय यावरील अनेक महत्वाच्या निष्पत्तींना निदर्शनास आणतो.

अहवाल कॉर्पोरेट एलअँडडी गुंतवणुकांच्या आरओआयचे सखोल विश्लेषण सादर करतो, जेथे ही बाब व्यवसायांना झपाट्याने बदलत असलेल्या आर्थिक व तंत्रज्ञान क्षेत्रात नेव्हिगेट करण्यास साह्य करण्यामध्ये महत्वाची बनली आहे. कर्मचा-यांच्या उत्पादकतेमधील सुधारणा कोणत्याही लर्निंग अँड डेव्हलपमेंट उपक्रमांच्या आरओआयचे मापन करण्यासाठी मापदंड म्हणून वापरली जाऊ शकते.

या अहवालातून निदर्शनास आलेल्या महत्वाच्या निष्पत्ती पुढीलप्रमाणे:

४२ टक्के प्रतिसादकांचा विश्वास आहे की प्रशिक्षणानंतर उत्पादकतेचा स्तर लक्षणीयरित्या जवळपास ४० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जवळपास २५ टक्के नियोक्त्यांचा विश्वास आहे की उत्पादकतेमधून नफा मिळवण्याचे प्रमाण मूल्यामध्ये ११ टक्के ते २० टक्के आहे. विद्यमान कर्मचा-यांसाठी २९ टक्के नियोक्त्यांचा विश्वास आहे की प्रशिक्षणानंतर उत्पादकतेमधून मिळणा-या नफ्यामध्ये ३१ टक्के ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. प्रशिक्षणानंतर नवीन कर्मचा-यांनी उत्पादकता मानकांची पूर्तता वेळेमध्ये जवळपास ८० टक्क्यांची बचत झाल्याचे सांगितले. ४२ टक्के प्रतिसादकांनी कर्मचा-यांच्या कामगिरीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले. नऊपैकी फक्त एका प्रतिसादकांचा विश्वास आहे की प्रशिक्षणामुळे नवीन कर्मचारी उत्पादकतेमध्ये मूल्यांची भर होत नाही. लक्षणीय म्हणजे ७३ टक्के प्रतिसादकांनी सांगितले की विद्यमान कर्मचारी उत्पादकता प्रशिक्षणानंतर दैनंदिन काम करताना ११ टक्के ते ४० टक्के कमी वेळ घेत आहेत.

टीमलीज एडटेकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू रूज यांनी सांगितले की, “उच्च डायनॅमिक व्यवसाय वातावरणामध्ये कॉर्पोरेट एलअँडडी प्रोग्राम्स कर्मचारी सहभाग कृतीऐवजी महत्वाचे धोरणात्मक उपक्रम म्हणून विकसित झाले आहेत. कॉर्पोरेट शिक्षणामध्ये गुंतवणुका कार्यक्षमपणे केल्यास कोणत्याही कंपनीची विक्री, महसूल आणि अगदी ग्राहक धारणेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. पण कर्मचा-यांच्या गरजा समजून घेणे आणि स्पष्टपणे परिभाषित उद्दिष्टांसह उपक्रम डिझाईन करणे महत्वाचे आहे.”


Back to top button
Don`t copy text!