महाराष्ट्रातील परिवहन सेवेबाबत दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळासमोर सादरीकरण


स्थैर्य, मुंबई, दि.१९: महाराष्ट्रातील परिवहन विभागांतर्गत सुरू असलेले महत्त्वाचे प्रकल्प, परिवहन सेवा, एसटी महामंडळ सेवा, भविष्यात राबविण्यात येणारे प्रकल्प यासंदर्भातील सादरीकरण परिवहन विभागाकडून परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळासमोर करण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृह येथे दक्षिण कोरियाच्या कौन्सिल जनरल यांच्यासमवेत शिष्टमंडळासमोर सादरीकरण करण्यात आले. या शिष्टमंडळामध्ये दक्षिण कोरियाचे कौन्सिल जनरल डाँग युंग किम, सांगजिन पार्क, कोत्राचे संचालक श्री. हाँग, कोरिया लँड आणि हाउसिंग कॉपोरेशनचे सँगसू ली यांचा समावेश होता.

राज्यातील परिवहन सेवा अधिक भक्कम करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रीक व्हेईकलसारख्या प्रकल्पांमध्ये दक्षिण कोरियाने सहकार्य करावे. परिवहन क्षेत्रातील गुंतवणूक,पर्यावरणपूरक परिवहन सेवा या संदर्भात महाराष्ट्र सहकार्य करेल असे यावेळी ॲड. परब यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!