प्रशांत नाळे यांचे जाणे चटका लावून जाणारे : श्रीमंत रामराजे 


स्थैर्य, फलटण, दि. २३: राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत नाळे याचे अचानकपणे जाणे हे मनाला चटका लावून जाणारे आहे अशी भावना विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

फलटण येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या सभागृहामध्ये प्रशांत नाळे यांच्या शोक सभेमध्ये विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, श्रीमंत रामराजे प्रतिष्ठान व सातारा जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने फलटण येथे प्रशांत नाळे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

खरंतर प्रशांतची आणि माझी ओळख झाल्यापासूनच्या पहिल्या दिवसापासून प्रशांत माझ्याशी कोणतीही गोष्ट बोलण्यासाठी घाबरत नव्हता. परंतु त्याने अशा प्रकारे शेवट करून घेण्याच्या आधी माझ्याशी किंवा कोणत्याही एका जवळच्या सहकार्यांशी बोलणे गरजेचे होते. आगामी काळामध्ये प्रशांत नाळे यांनी सुरू केलेले काम तुम्ही सर्व तरुणांनी पुढे घेऊन जावा व प्रशांत नाळे यांना कामातूनच श्रद्धांजली अर्पण करा ,असे आवाहन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!