
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
विधानसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने लोणंद पोलीस ठाणे हद्दीत आयटीबीपी कंपनी यांच्यासोबत १ नोव्हेंबर रोजी बिबी, आळजापूर, हिंगणगाव, सासवड, तरडगाव (ता. फलटण) या गावांतून रुट मार्च घेण्यात आला, अशी माहिती लोणंद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी दिली.
या रुट मार्चमध्ये लोणंद पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी, १८ पोलीस अंमलदार, तसेच आयटीबीपी कंपनीचे १ अधिकारी व २४ जवान यांनी सहभाग घेतला होता.
