पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठा दिलासा; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या उमेदवारांसाठी महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मैदाने विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आदेश नगरविकास विभागाने जारी केले आहेत.

स्थैर्य,सातारा, दि. १८ नोव्हेंबर : राज्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. भरतीच्या मैदानी चाचणीचा सराव करण्यासाठी राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मैदाने उमेदवारांना पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नगरविकास विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन परिपत्रक जारी केले असून, त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचा मोठा आर्थिक भार हलका होणार आहे.

कोणतेही शुल्क किंवा अनामत रक्कम नाही

नगरविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या उमेदवारांकडून मैदानाच्या वापरासाठी कोणत्याही प्रकारचे भाडे, वापरशुल्क, प्रवेशशुल्क किंवा अनामत रक्कम आकारता येणार नाही. पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते प्रत्यक्ष मैदानी चाचणी संपेपर्यंत ही विनामूल्य सुविधा उमेदवारांसाठी सुरू राहणार आहे. काही ठिकाणी सरावासाठी पैसे मोजावे लागत असल्याने उमेदवारांची मोठी अडचण होत होती, ती आता दूर झाली आहे.

सरावाच्या वेळा आणि आवश्यक सुविधा

उमेदवारांच्या सोयीसाठी पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत मैदानावर सरावाला प्राधान्य देण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. याशिवाय, सरावासाठी येणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मैदानावर पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, बदलकक्ष, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!