
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । सातारा । सातारा व जावली तालुक्यातील पोलीस पाटील भरती -2022 परीक्षा 13 मार्च 2022 रोजी होणार आहे. पात्र उमेदवारांचे लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र संबंधित तलाठी, मंडल अधिकारी यांच्याकडून 10 मार्च 2022 पासून वाटप सुरु करण्यात आले आहे. तरी आपले प्रवेशपत्र ताब्यात घेऊन त्यावरील माहितीची खात्री करावी. उमेदवारांनी प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनांचे व्यवस्थित वाचन करावे. तसेच प्रवेशपत्र न मिळालेल्या उमेदवारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, सातारा येथून 11 व 12 मार्च रोजी व्यक्तिश: प्रवेशपत्र घेऊन जावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.
