
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा पोलीस दलातील दहा अधिकार्यांना बढती मिळून त्यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
या बदल्यांतर्गत सातारा नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना बढती मिळून त्यांची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी नेमणूक झाली आहे. तसेच सातारा सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांची फलटण शहर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी नेमणूक झाली आहे.
