फलटणमध्ये पोलिसांनी शोधले हरवलेले स्मार्टफोन; तुमचा फोन आहे का?; पहा सविस्तर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 23 जुलै 2024 | फलटण | फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गहाळ झालेले तब्बल 20 स्मार्टफोन हे शोधण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की; गेल्या काही महिन्यांमध्ये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक स्मार्टफोन गहाळ झाल्याच्या नोंदी ह्या फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आल्या होत्या. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची टीम ऍक्टिव्ह मोडवर येऊन त्यांनी मागील महिन्यामध्ये 30 व या महिन्यांमध्ये 20 असे एकूण 50 स्मार्टफोन शोधलेले आहेत.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये नोंद झालेले स्मार्टफोन शोधताना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या टीमने स्मार्टफोन शोधलेले आहेत.

ज्यांचे स्मार्टफोन हरवले असतील व त्यांनी फलटण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असेल तर त्यांनी याबाबतचे माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन व फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!