
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. ५ जुलै : पावसाळ्याला सुरुवात झाली की, सातारा शहर आणि परिसरातील चौका-चौकांत गरमागरम भाजलेल्या मक्याच्या कणसांचा खमंग वास दरवळू लागतो. सध्या या पावसाळी वातावरणात गरम शेगडीवर भाजली जाणारी मक्याची, अर्थात ‘स्वीट कॉर्न’ची कणसे सातारकरांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत.
कराडच्या मक्याला बाजारात मागणी:
सध्या बाजारात कराड आणि परिसरामध्ये पिकवली जाणारी ही गोड मक्याची (स्वीट कॉर्न) कणसे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. ही चविष्ट आणि गरमागरम कणसे ५० रुपयांना ४ या किफायतशीर दराने मिळत असून, सातारकर या पावसाळी मेजवानीवर यथेच्छ ताव मारताना दिसत आहेत.
(छायाचित्र: अतुल देशपांडे, सातारा)
