स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
November 26, 2022
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । २६/११  च्या दहशतवादी हल्ल्यावेळी धाडसी कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.

पोलिस बॉइज चॅरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गेट वे ऑफ इंडिया येथे २६/११ हल्ल्यातील शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांचा आणि कर्मचाऱ्यांचा  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते  गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यासह देशाच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल येथे 26 नोव्हेंबर 2008 रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वार झालेला हल्ला आहे. हा हल्ला परतविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा दलातील वीर शहिदांप्रती सहसंवेदना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.  आज आपण मोठ्या संख्येने येथे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलो आहोत, असे ते म्हणाले.

ज्या समाजात वीरांचा सन्मान होतो तोच समाज प्रगती करतो. पोलीस, सुरक्षा कर्मचारी आपले कर्तव्य अविरतपणे बजावत असतात. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणही समाजात वावरतांना अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांबाबत सुरक्षिततेच्यादृष्टिने नेहमी सतर्क राहिले पाहिजे.  या निमित्ताने आपण सर्वजण सदैव सतर्क राहण्याचा  निर्धार  करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री यांनी यावेळी केले.

उपमुख्यमंत्र्यांकडून कमांडर सुनील जोधा यांचा सन्मान

२६/११  च्या ताज हॉटेलवरील हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदिप उन्नीकृष्णन यांच्या नेतृत्त्वात झालेल्या ऑपरेशनमध्ये कमांडर सुनील जोधा यांनी 7 गोळ्या अंगावर झेलून ताज हॉटेलमधील नागरिकांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्‍न केले होते. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सुनील जोधा यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. कमांडर श्री.जोधा यांनी आजही एक गोळी त्यांच्या शरीरामध्ये असल्याचे  यावेळी सांगितले.

शहीद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ सांगली ते मुंबई ‘शहीद दौड’

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ सांगली ते मुंबई मशालीसह ‘शहीद दौड’ चे आयोजन करण्यात आले होते. सांगली येथील सुमारे 25 तरुणांनी या हल्यातील शहिदांना या वेगळ्या उपक्रमातून श्रद्धांजली वाहिली. २६/११  च्या हल्ल्यातील शहिदांसाठी केलेल्या या विशेष उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी तरुणांचे कौतुक केले.

या कार्यक्रमास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Previous Post

संविधान दिन : राजभवन येथे संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

Next Post

प्रश्‍न ओळखून त्यावरचं उत्तर शोधायला यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला शिकवलं : पद्मश्री लक्ष्मण माने

Next Post
मुलाखतीप्रसंगी बोलताना पद्मश्री लक्ष्मण माने. सोबत ताराचंद्र आवळे.  (छाया : बंडू चांगण, फलटण)

प्रश्‍न ओळखून त्यावरचं उत्तर शोधायला यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला शिकवलं : पद्मश्री लक्ष्मण माने

ताज्या बातम्या

कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

January 28, 2023

छत्रपती शिवाजी कॉलेजेमध्ये शहीद वीर व राष्ट्रनिर्मात्याना मानवंदना

January 28, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या गट क्र. २२ च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

January 28, 2023

“तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे”; संजय राऊतांचे CM एकनाथ शिंदेंना आव्हान

January 28, 2023

कीर्तन परंपरेचा आजच्या काळात नव्याने अभ्यास होणे गरजेचे – प्रा. डॉ. धनंजय होनमाने

January 28, 2023

भारतीय बौद्ध महासभा अंकुर बौद्ध विहार शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

January 28, 2023

प्रजासत्ताक दिनी आटपाडीत प्रथमच सागर यांनी केली सत्यशोधक वास्तू पूजन

January 28, 2023

पारसिक बोगद्यामुळे प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

January 28, 2023

भ्रष्टाचारमुक्तीचा संकल्प करा – हेमंत पाटील

January 28, 2023

विद्यार्थ्यांनो हसत खेळत परीक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

January 28, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!