फलटणकरांनो आता दारू पिऊन गाडी चालवू नका; पोलीस आहेत ऍक्शन मोडवर; एकाच दिवशी चार गुन्हे दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 31 डिसेंबर 2024 | फलटण | फलटण शहरात दारू पिऊन वाहन चालविण्याच्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईचा भाग म्हणून, पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करून आरोपींना पकडले. दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी व रात्री वेगवेगळ्या वेळी चार वेगवेगळ्या घटना घडल्या. पोलीस ठाण्यात या घटनांसंबंधित प्रथम खबर नोंदणी क्र. 645, 646, 647, आणि 648/2024 मोटार वाहन अधिनियम कलम 185 प्रमाणे करण्यात आली.

नाना पाटील चौक, फलटण येथे रात्री 18:29 वाजता अनिल कृष्णा बहादुर (वय 45 वर्ष), रा. खाऊगल्ली, फलटण, त्याच्या स्कुटी मोटार सायकल (MH 14 GT 7932) वेडीवाकडी चालवत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. ब्रेथ अँनालायझर मशिनच्या तपासणीनुसार, त्याने दारुचे सेवन केल्याचे प्रमाणित झाले.

श्रीराम साखर कारखाना बायपास, फलटण येथे रात्री 20:43 वाजता गंगाराम अंकुश क्षिरसागर (वय 34 वर्ष), रा. निरगुडी, फलटण, त्याच्या मोटार सायकल (MH 11 AQ 5175) वेडीवाकडी चालवत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. ब्रेथ अँनालायझर मशिनच्या तपासणीनुसार, त्याने दारुचे सेवन केल्याचे प्रमाणित झाले.

श्रीराम साखर कारखाना बायपास, फलटण येथे रात्री 20:09 वाजता अक्षय बजरंग बनकर (वय 30 वर्ष), रा. जाधववाडी, फलटण, त्याच्या मोटार सायकल (MH 42 AT 934) वेडीवाकडी चालवत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. ब्रेथ अँनालायझर मशिनच्या तपासणीनुसार, त्याने दारुचे सेवन केल्याचे प्रमाणित झाले.

नानापाटील चौक, फलटण येथे रात्री 23:49 वाजता आकाश नागनाथ हजारे (वय 30 वर्ष), रा. बोंबाळे हजारेवस्ती, ता. खटाव, त्याच्या मोटार सायकल (MH 12 SU 2942) वेडीवाकडी चालवत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. ब्रेथ अँनालायझर मशिनच्या तपासणीनुसार, त्याने दारुचे सेवन केल्याचे प्रमाणित झाले.

पोलीस अधिकारी स.पो.फौ. सुरेश शिंदे यांनी या सर्व घटनांची तपासणी केली आणि आरोपींविरुद्ध आवश्यक कारवाई सुरू केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपींच्या वाहनांची ताब्यात घेणे आणि त्यांना न्यायालयात हजर करणे समाविष्ट आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!