दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । फलटण । कर्मवीर भाऊराव पाटील व भगवान गौतम बुद्ध यांचे चरित्र, त्यांचे विचार, त्यांनी घालुन दिलेले आदर्श याविषयी सविस्तर विवेचन करुन प्राचार्य शांताराम आवटे यांनी आपण कसे जगावे या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मसाप फलटण शाखा, साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण आणि जायंटस ग्रुप फलटण यांचे संयुक्त सहभागाने डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी व बुद्ध पौर्णिमा निमित्ताने आयोजित नवचेतना कवि संमेलनात अध्यक्ष स्थानावरुन मार्गदर्शन करताना प्राचार्य शांताराम आवटे बोलत होते. यावेळी साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशनचे अध्यक्ष साहित्यिक ताराचंद्र आवळे, जायंटस ग्रुपचे मोहनराव नाईक निंबाळकर, शिरीष शहा यांच्या सह शहरवासीय उपस्थित होते.
नवचेतना कवि संमेलनात कवी राहुल निकम, प्रा. अशोक माने, ज. तु. गार्डे, आकाश आढाव, अविनाश चव्हाण, प्रा. नितीन नाळे, गुडाराज नामदास, प्रतीक्षा कांबळे, ऐश्वर्या जगताप यांनी बहारदार कविता सादर केल्या. या कविसंमेलनाततून आगळ्या वेगळ्या पद्धतीने कर्मवीर भाऊराव पाटील व भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात आले.
- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -
टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज
यावेळी प्रेरणादायी, वास्तववादी, कर्मवीर भाऊराव पाटील व बुद्ध यांना अभिप्रेत असणारा समाज कसा असावा प्रेम, मोह, माया, समाजशिक्षण अशा आशयाच्या विविधांगी कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.
संयोजक ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविकात कवी संमेलना विषयी माहिती दिली, कवी अविनाश चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी प्रभाकर भोसले, नितीन बोडके, दत्तात्रय खरात, राजेश पाटोळे, सौ. सुरेखा आवळे व साहित्यप्रेमी रसिक उपस्थित होते.